वनहक्क व स्थानिक नियोजन
आम्ही वन व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी, ग्रामसभा संस्था बळकट करण्यासाठी, आणि 10 वर्षांच्या सामूहिक वनहक्क (CFR - Community Forest Rights) सूक्ष्मयोजना तयार करण्यासाठी विविध हितधारकांबरोबर विस्तृत बैठकांचे आयोजन करतो.
शेती व स्थानिक निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग
आम्ही आदिवासी महिलांमध्ये शेती, निर्णयप्रक्रिया आणि स्थानिक स्वशासन याबाबत चर्चा, नेतृत्व आणि सहभाग वाढवण्यावर भर देतो.
शाश्वत उपजिविका आणि पर्यावरणपूरक शेती
आम्ही पारंपरिक पद्धतींवर आधारित जैवविविध शेतीस प्रोत्साहन देतो आणि मूल्यवर्धित उत्पादनाच्या माध्यमातून टिकाऊ उपजिविकेची संधी निर्माण करतो.
🌱 हक्क, सन्मान आणि शाश्वततेसाठी — सप्तपुड्याच्या दऱ्यांमधून चालत आहोत.